गुणाट येथे महसूल व पोलीस खात्याच्या संयुक्त कारवाई पकडलेले दोन हायवा ट्रक चालक व मालकावर शिरूर पोलीस स्टेशन येथे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाई ६० लाख ६४ हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे शिरूर ते तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे ॲक्शन मोडवर आले आहे.
याबाबत शिरूर पोलीस व महसूल खात्याने केलेल्या कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे.
याबाबत सचिन अजिनाथ भोई पोलीस अमलदार (शिरूर पोलीस स्टेशन जि पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी दोन हायवा ट्रकचे अज्ञात चालक व मालक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक २९ डिसेंबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता गुणाट चौफुला ता .शिरूर येथे फिर्यादी सचिन भोई व शिरूर चे नायब तहसीलदार विनय कौलवकर ,पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक शुभम चव्हाण, पोलीस अंमलदार नाथसाहेब जगताप, नितेश थोरात,तलाठी सुनिल पडवळ, कोतवाल अनुज वाघामारे, या पथकाने वाळु वाहतुक करणारे हायवा डंपर नं. एम एच. 12 डब्ल्यू एक्स 6199, एम एच 12पी फ्यू 0099 ह्यामध्ये प्रत्येकी 4 ब्रास वाळु सह पकडले तर चालक है अंधाराचा फायदा घेवून पळून गेले होते, त्यावेळी नायब तहसिलदार कौलवकर त्याबाबत ऑनलाईन पंचनामा केला दोन ट्रक किंमत साठ लाख व आठ ब्रास वाळू किंमत ६४ हजार असा एकूण ६० लाख ६४ हजाराचा ऐवज जप्त करुन ताब्यात घेतला असून शिरूर चे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार कौलवकर यांनी गुन्हा दाखल करणेबाबत जबाब दिल्याने शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार सचिन भोई यांनी फिर्याद दिली आहे. ट्रकचे चालक व मालक यांच्यावर गौणखणी चोरीचा गुन्हा व वाहतूक करणे याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करीत आहे.
महसूल व शिरूर पोलीस स्टेशनच्या पथकाने पकडलेल्या या वाळू चोरी व वाहतूक करणाऱ्या वाळू तस्करांनी 14 तास ट्रकच्या चाव्या दिल्या नव्हत्या यावर नाईन स्टार न्युज यांनी आवाज उठवल्यानंतर अखेर शिरूर पोलिसांनी महसूल खात्याच्या आदेशाने गुन्हा दाखल केल्याने मात्र शिरूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा करणारे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे.