देशातील सहकार्याचं जाळ विकास कार्यकारी सोसायटीवर अवलंब असून,प्रत्येक गावातील विकास सोसायटी म्हणजे गावातील अर्थकारणाची प्रमुख सोत्र असून या सोसायटी जर बंद पडल्या तर गावाचा विकास ठप्प होतो त्यासाठी या पुढील काळामध्ये विकास सोसायटी चांगल्यासक्षमपणे चालण्यासाठी त्यांना ताकद देण्याचे काम केंद्रीय सहकार खात्यातून देण्यात येईल असे आश्वासन केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिले आहे.
शिरूर खरेदी विक्री संघ येथे केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिरूर खरेदी विक्री संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी भारतीय जनता पक्षाची संदीप भोंडवे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल पाचर्णे,तालुकाध्यक्ष प्रदीप सोनवणे, खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष शरद कालेवार, राजेंद्र नरवडे बाळासाहेब नागवडे, सदस्य संतोष मोरे, शिरूर विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आप्पासाहेब वर्पे, प्रकाश थोरात, केशव लोखंडे , दौलतराव खेडकर , सर्जेराव दसगुडे ,व मोठ्या प्रमाणात नागरिक, भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
शिरूर विकास कार्यकारी सोसायटी ही या आठ गावांची मिळून एक सोसायटी आहे परंतु मधल्या काळातील काही गोष्टींमुळे या सोसायटीवर बंधने आली आहे. ३३७१ सभासद असणारी ही आठ गावांची सोसायटी यामध्ये १८७५ बिगर कर्जदार सभासद आहे. ही चांगली सोसायटी असून ही सोसायटी पुन्हा चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी माझ्याकडे सभासदांनी निवेदन दिले आहे .ही सोसायटी पुन्हा चांगल्या जोमाने चालेल यासाठी जिल्हा मिनिस्टर, जिल्हा बँकेचे चेअरमन गरज पडल्यात राज्य सहकारी बँकेचे संचालक यांच्याशी बोलून शिरूर विकास कार्यकारी सोसायटी सुरळीत व सक्षमपणे कशी चालेल यासाठी प्रयत्न करणारा असल्याचेही मोहोळ यांनी सांगितले.
प्रत्येक गावात असणारी विकास कार्यकारी सोसायटी म्हणजे नागरिक व त्यांच्या कुटुंबाची अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून जोडले गेलेली एक संस्था आहे नागरिकांच्या जीवनाची विकास सोसायटी जोडली गेलेली असते म्हणून ही संस्था चांगल्या प्रकारे व सक्षम चालल्या पाहिजेत असेही मोहोळ यांनी सांगितले.