शिरूर न्हावरा रोडवर न्हावरे ते आबळे शिवरस्त्याचे पुढे रस्त्यावर नियमाचे उल्लंघन करून थांबवलेल्या उसाच्या ट्रॉलीला दुचाकीची पाठीमागून धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकी वरील एकाच मृत्यू झाला आहे.
गोरक्षनाथ मोहन घायतडक, (वय 51 वर्षे, रा. करडे ता. शिरूर, जि. पुणे) या दुकचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू झाला आहे.
याप्रकरणी मच्छिंद्र मोहन घायतडक (वय 47, रा. करडे, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत ट्रॅक्टर नं. एम. एच. 16/ डी. सी. 8710 वरील अज्ञात चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक 30 नोव्हेंबर रात्री सव्वा नऊ वाजता आंबळे शिरूर न्हावरा रोडवरे न्हावरे ते आंबळे शिवरस्त्याचे पुढे शिरूर बाजुकडे थोड्या अंतरावर ट्रॅक्टर नं. एम. एच. 16/ डी. सी. 8710 वरील चालक (नाव पत्ता माहीत नाही) याने त्याचे ताब्यातील ट्रॅक्टरला उसाने भरलेली ट्रॉली जोडुन तो रोडचे नियमाकडे दुर्लक्ष करून, येणारे जाणारे लोकांचे जिवीताला धोका होईल अशा रितीने रोडवर उभे करून, कोणतेही इंडीकेटर तसेच पार्किंग लाईट न लागता, पाठीमागे कोणतेही रिप्लेक्टर न लावता, उभा करून निघुन गेल्याने अंधारामध्ये समोर ट्रॅक्टर ट्रॉली न दिसल्याने गोरक्षनाथ घायतडक हा त्याचे ताब्यातील दुचाकी नंबर एम. एच. 12 / एम. पी. 2534 हीवरून न्हावरा बाजुकडुन शिरूर बाजुकडे येत असतांना ट्रॉलीला मागुन धडकुन अपघात होवुन अपघातात गंभीर जखमी होवुन मयत झाला आहे.
याबाबत फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार थेऊरकर करीत आहे.