शिक्रापुरात भरदिवसा माजी उपसरपंचांची हत्या युवकाच्या शस्त्र हल्ल्यात दत्तात्रय गिलबिलेंचा मृत्यू

9 Star News
0
शिक्रापुरात भरदिवसा माजी उपसरपंचांचा खून
युवकाच्या शस्त्र हल्ल्यात दत्तात्रय गिलबिलेंचा मृत्यू 
शिरूर 
( प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच दत्तात्रय बंडू गिलबिले यांचा एका युवकाने जुन्या वादाच्या कारणातून भरदिवसा धारदार शस्त्राने हल्ला करुन गळ्यावर वार करत खून केल्याची घटना घडली आहे. हल्ला केल्यानंतर आरोपी पळून गेला आहे.
          या हल्ल्यात दत्तात्रय बंडू गिलबिले (वय ५२ रा. कोयाळी पुनर्वसन शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) याची हत्या झाली आहे.
          याबाबत रोहिणी दत्तात्रय गिलबिले (वय ४२ रा. कोयाळी पुनर्वसन शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
         पोलिसांनी पप्पू नामदेव गिलबिले (रा. कोयाळी पुनर्वसन शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) याच्या विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला 
                 याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे फिर्यादीच्या फिर्यादीवरून दिनांक एक डिसेंबर रोजी दुपारी एकच्या दरम्यान शिक्रापूर ता. शिरुर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच व शिवंसेना शिंदे गटाचे जिल्हा सल्लागार दत्तात्रय बंडू गिलबिले यांचे व त्यांच्या घराजवळील पप्पू गिलबिले या युवकाचे काही दिवसांपूर्वी दत्तात्रय व पप्पूच्या पत्नी या दोघांमध्ये मोबाईलवर झालेल्या चाटिंगच्या कारणातून वाद झालेला होता, तर आज दतात्रय गिलबिले हे दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराच्या खाली बसलेले असताना अचानकपणे आलेल्या पप्पू गिलबिले या युवकाने धारदार चाकुने दत्तात्रय गिलबिले यांच्या मानेवर वार करत जखमी केले, दरम्यान नागरिकांनी दत्तात्रय गिलबिले यांना उपचारासाठी शिक्रापूर येथील खाजगी रुग्णालयात नेले, घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांसह आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत परिस्थिती आटोक्यात आणली, तर गिलबिले यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी वाघोली येथे हलवण्यात आले मात्र उपचारापूर्वी दत्तात्रय बंडू गिलबिले (वय ५२ रा. कोयाळी पुनर्वसन शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांचा मृत्यू झाला मात्र पप्पू गिलबिले हा सदर हल्ल्यानंतर फरार झाला असून, फिर्यादीवरून पप्पू गिलबिले याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय मस्कर हे करत आहे.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!