भोसरी परिसरातील इंद्रायणी नगर भागात ओम पाटील यांना त्यांच्या घरासमोर झाडांवर हिरव्या रंगाचा साप असल्याचे दिसल्याने त्यांनी याबाबतची माहिती निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे सचिव सर्पमित्र अमर गोडांबे व सर्पमित्र राजू कदम यांना दिली असता सर्पमित्र अमर गोडांबे यांनी तेथे धाव घेत पाहणी केली असता घरासमोरील झाडावर हरणटोळ जातीचा साप असल्याचे दिसून आले, मात्र भोसरीत प्रथमच हरणटोळ जातीचा साप आढळून आला असून भीमाशंकर, माथेरान येथील जंगल भागात आढळणारा हा हरणटोळ जातीचा साप वाहणांच्या प्रवासातून येथे आल्याचा अंदाज निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे सचिव सर्पमित्र अमर गोडांबे यांनी वर्तविला असून भोसरीत प्रथमच हरणटोळ जातीचा साप आढळून आल्याने सर्पमित्रांनी देखील आच्छर्य व्यक्त केले आहे.
सोबत - हरणटोळ साप फोटो.