शिरूर येथे तरुणाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

9 Star News
0
शिरूर प्रतिनिधी 
         शिरूर तालुक्यात तरुणाच्या त्रासाला कंटाळून १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केले की धक्कादायक घटना घडली असून, या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
        शिरूर शाळा परिसरातील रोड रोमियांवर कडक कारवाई करणे गरजेचे.
         याबाबत मुलीच्या कुटुंबीयांनी
 शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी प्रणव अशोक उबाळे ( कॉलनी, रामलिंग रोड शिरुर ता. शिरुर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे
शिरूर शहरात शिक्षण घेणारी अल्पवयीन मुलगी तिच्या मामाच्या गावी राहत असून, ती महाविद्यालयात जात असताना प्रणव उबाळे हा वारंवार भेटून त्याच्याशी बोलण्याबाबत दबाव टाकत होता. मुलीने भेटण्यास व बोलण्यास नकार देत असल्याने प्रणव याने तू शिक्षण घेत असलेल्या शाळेत तसेच शाळेबाहेर तुझी बदनामी करेल अशी धमकी देखील दिली. हा त्रास असह्य झाल्याने तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे करत आहेत.
         शिरूर परिसरातील कॉलेज व शाळा परिसरात मोठ्या प्रमाणात रोड रोमियो यांचा वावर आहे. यांच्यावर पोलीस कारवाई करत आहे परंतु ती फक्त दंडात्मक असल्याने दंड भरून हे रोड रोमिओ पुन्हा मोकाट सुटत आहे. त्यामुळे शाळकरी व कॉलेज शिकणाऱ्या मुली, महिला शिरूर शहरात सुरक्षित नसल्याचे दिसून आले आहे. याबाबत पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी महिला वर्गातून होत आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!