पिंपळे जगतापमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू

9 Star News
0
पिंपळे जगतापमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू
शिरूर 
( प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर येथील शिक्रापूर चाकण रस्त्यावर दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकस्वाराचा मृत्यू झाला आहे.
          शिक्रापूर ता. शिरुर येथील शिक्रापूर चाकण रस्त्याने अभय चव्हाण हा त्याच्या ताब्यातील एम एच १४ एल जि १८६१ या दुचाकी हून जात असताना पिंपळे जगताप येथील नवोदय विद्यालय समोर पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाची धडक अभयच्या दुचाकीला बसून अभय रस्त्यावर पडला दरम्यान धडक देणाऱ्या वाहनाचे चक अभयच्या डोक्यावरून गेल्याने अभय बाळकृष्ण चव्हाण वय ४० वर्षे रा. पाटवस्ती शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे याचा जागीच मृत्यू झाला याबाबत बबन दगडू चव्हाण वय ५५ वर्षे रा. शिक्रापूर या. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार नरेंद्र गायकवाड हे करत आहे.
सोबत – अभय चव्हाणचा फोटो.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!