( प्रतिनिधी ) शिरूर जोशीवाडी येथे घरात झालेल्या वादाच्या रागातून तरूणाने विषारी औषध खाल्ल्याने त्याचा मृत्यू झाला असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
रुशभ नवीन भोसले (वय २३ वर्षे रा. जोशीवाडी शिरुर ता. शिरुर जि. पुणे )याचा मृत्यू झाला.
शिरुर शहरातील जोशीवाडी येथील रुशभ भोसले या युवकाचे घरात वाद झाल्याने त्याने रागाचे भरात उंदीर मारण्याचे औषध खाल्ल्याने त्याला उलट्या होऊ लागल्या, दरम्यान त्याच्या कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी शिरुर येथील रुग्णालयात दाखल केले, दरम्यान रुशभ याच्यावर उपचार सुरु असताना उपचारा दरम्यान रुशभ नवीन भोसले वय २३ वर्षे रा. जोशीवाडी शिरुर ता. शिरुर जि. पुणे याचा मृत्यू झाला, याबाबत सुप्रिया रुशभ नवीन भोसले वय २० वर्षे रा. जोशीवाडी शिरुर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिरुर पोलिसांत खबर दिल्याने पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साबळे हे करत आहे.