शिरूर
( प्रतिनिधी ) तरडोबावाडी शिरूर येथे युवतीला लग्नाच्या आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पराग ज्ञानेश्वर बोटकर (वय २२ वर्षे रा. गोलेगाव रोड शिरुर ता. शिरुर जि. पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोलेगाव ता. शिरुर येथील युवतीला रात्रीच्या सुमारास पराग बोटकर या युवकाने तर्डोबाची वाडी येथील एका मंदिराजवळील शेतामध्ये घेऊन जात युवतीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला, मात्र घाबरलेल्या युवतीला घडलेला प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगत थेट शिरुर पोलीस स्टेशन गाठले, याबाबत पिडीत युवतीने शिरुर पोलिसांत फिर्याद दिल्याने पोलिसांनी पराग ज्ञानेश्वर बोटकर वय २२ वर्षे रा. गोलेगाव रोड शिरुर ता. शिरुर जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे या करत आहे.