सणसवाडी ता. शिरुर पुणे नगर महामार्गावर दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला आहे. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात वाहनाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विष्णू गोपीचंद पुरी (वय ५५ वर्षे सध्या रा. टाकळी हाजी ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. बेलोरा ता. पुसद जि. यवतमाळ) यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.
याप्रकरणी सविता विष्णू पुरी (वय ४० वर्षे सध्या रा. टाकळी हाजी ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. बेलोरा ता. पुसद जि. यवतमाळ) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे
सणसवाडी ता. शिरुर येथील पुणे नगर महामार्गावरुन विष्णू पुरी हे त्यांच्या ताब्यातील एम एच १२ बी एफ २८१२ या दुचाकीहून आळंदी कडे चाललेले असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाची विष्णू यांच्या दुचाकीला धडक बसून विष्णू गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडले दरम्यान नागरिकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी विष्णू गोपीचंद पुरी यांचा उपचारापुर्वी मृत्यू झाल्याचे घोषित केले, याबाबत सविता विष्णू पुरी वय ४० वर्षे सध्या रा. टाकळी हाजी ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. बेलोरा ता. पुसद जि. यवतमाळ यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार दामोदर होळकर हे करत आहे.