शरदचंद्र पवार साहेबांनी जनतेच्या ऐकावे कार्यकर्ते व खोटे सांगणारे नेत्यांची ऐकू नये लोकशाही वरील लोकांचा विश्वास उठेल व लोकशाही प्रक्रिये वरील लोकांचा विश्वास उठेल अशी कार्यवाही किमान शरद पवार साहेबांनी करू नये असा सल्ला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना देऊन,शरद पवार साहेबांना 50 वर्षापेक्षा जास्त प्रदीर्घ अनुभव असलेले नेते आहेत . अशा नेत्यांनी संयमाने वागायची असते व पराभव स्वीकारायचा असतो. कार्यकर्त्यांच्या दबावावाखाली शरद पवार साहेब वागत असतील असेही फडणवीस यांनी सांगून पवार साहेबाना महिती आहे पराभव का झाला.
अबू आझमी व सपा भाजपाची बी टीम आहे असा आरोप माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आरोपावर बोलण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी टाळले.
टाकळी हाजी तालुका शिरूर येथे सुद्रिक यांच्या विवाह निमित्त आशीर्वाद देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तर लग्नसमारंभात आमदार प्रवीण दरेकर यांनी मंगलाष्टका म्हटली.
बबनराव सुद्रिक व त्यांच्या कुटुंबाचे माझे चांगले संबंध आहे. एका वाईट घटने नंतर त्याच्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही सर्वजण राहिलो त्यामुळे जवळीकता झाली आहे व त्यांच्या घरातील विवाह निमित्त त्यांची आमंत्रण आल्यानंतर मी त्यांना विहाला नक्की येईल असे सांगितल्यानंतर मी आशीर्वाद देण्यासाठी आलो होतो. आशीर्वाद देण्यासाठी मी व आमदार प्रविण दरेकर व आमदार राम शिंदे आलो आहे. आशीर्वाद देऊन आता निघालो आहे.
असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सांगून शरदचंद्र पवार साहेब ज्येष्ठ नेते आहे. त्यांनी कार्यकर्त्यांचा ऐकू नये पराभव स्वीकारला पाहिजे असे माझे मत असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.