तळेगावात ढमढेरे येथील घटना : शिक्रापूर पोलिसांत दोघांवर गुन्हा
शिरूर,प्रतिनीधी
तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील एकाला फायनान्स कंपनीने कर्जासाठी घर गहाण ठेवून घेऊन कर्जाचे हप्ते भरुन सुद्धा कर्ज न देत त्रास दिल्याने एकाने आत्महत्या केली.
शिक्रापूर पोलीस स्टेशन महिंद्रा फायनान्स कंपनीचे सूरज दिलीप पवार व महेंद्र पाटील या दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे.
हरिभाऊ रघुनाथ गायकवाड (वय ५३, रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरुर), असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.
तळेगाव ढमढेरे येथील हरिभाऊ गायकवाड यांना व्यवसायसाठी कर्ज घ्यायचे असल्याने त्यांनी शिक्रापूर येथील महिंद्रा फायनान्स कंपनीमध्ये सूरज
दिलीप पवार व महेंद्र पाटील या दोघांशी चर्चा केली. फायनान्सने घराचे कागदपत्र देत घराचे गहाणखत करुन दिले. फायनान्स कंपनीने त्यांना काही हप्ते देखील भरण्यास सांगितले. परंतु कर्जाच्या रकमेचा चेक त्यांना गायकवाड यांना दिला नाही. त्यांनतर वेळोवेळी हरिभाऊ फायनान्स कंपनीमध्ये गेले असताना त्यांना वेळोवेळी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांनतर पुन्हा पुणे येथील कार्यालयात बोलावून घेऊन तुम्हाला काय करायचे ते करा कर्ज देणार नाही आणि घराचे गहाणखत बदलणार नाही, अशी धमकी दिल्याने हरिभाऊ रघुनाथ गायकवाड यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत शीतल हरिभाऊ गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.