शिरूर
( प्रतिनिधी ) शिरूर येथे महाविद्यालयीन युवतीला धमकी देत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल दिगंबर कांबळे (रा. तर्डोबाची वाडी ता. शिरुर जि. पुणे) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शिरुर शहरात महाविद्यालयीन शिक्षण घेणारी युवती तीच्य मैत्रिणीसह घरी जात असताना पाठीमागून एम एच १२ एस डब्ल्यू ८६९२ या दुचाकीहून आलेल्या राहुल कांबळे याने युवतीचा पाठलाग करत युवतीच्या दुचाकीला त्याची दुचाकी आडवी लावून युवतीला शिवीगाळ करततुझे अश्लील फोटो बनवून फोटो व्हायरल करुन तुझी बदनामी करेल अशी धमकी देऊन जीवे मारण्याची धमकी देत विनयभंग केला, याबाबत पिडीत युवतीने शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी राहुल दिगंबर कांबळे (रा. तर्डोबाची वाडी ता. शिरुर जि. पुणे) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार दिपक राऊत हे करत आहे.