उरळगाव येथे जीप दुचाकी अपघातात तरुणाच मृत्यू

9 Star News
0
शिरूर,प्रतिनीधी
      उरळगाव (ता.शिरूर) येथील न्हावरे-तळेगाव ढमढेरे महामार्गावर जिओ पेट्रोल पंपा समोर भरधाव वेगात आलेल्या महेंद्रा जीपने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार युवक जागीच ठार झाला.
       विशाल बाळासाहेब राजगुरव(वय – ३२,रा.निर्वी ता.शिरूर,जि.पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
       याबाबत शिरूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल राजगुरव हे आपल्या दुचाकीवरून न्हावरे मार्गाने सणसवाडीकडे कामानिमित्त चालले होते. दरम्यान उरळगाव हद्दीत जियो पेट्रोल पंपासमोर तळेगाव ढमढेरे बाजूने आलेल्या फोर व्हीलर जीपने राजगुरव यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये राजगुरव हे गंभीर जखमी झाले. पुढील उपचारासाठी न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. प्रमोद राजगुरव यांनी या घटनेची फिर्याद दिली. पुढील तपास शिरूर पोलीस करत आहेत

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!