कोरेगाव भिमातून युवतीचे अपहरण करुन अत्याचार करणारा अटक

9 Star News
0
कोरेगाव भिमातून युवतीचे अपहरण करुन अत्याचार करणारा अटक 
शिरूर ( प्रतिनिधी ) कोरेगाव भीमा ता. शिरुर येथील ढेरंगे वस्ती येथून एका चौदा वर्षीय अल्पवयीन युवतीचे अपहरण करुन युवतीला लग्नाचे आमिष दाखवत युवतीवर अत्याचार करणाऱ्याला पोलिसांनी परभणी मधून ताब्यात घेत अटक केली आहे . दुर्गादास रेशीम मकर (रा. गंगाखेड ता. गंगाखेड जि. परभणी )असे पोलिसांनी अटक केलेल्या युवकाचे नाव आहे.
                        कोरेगाव भीमा ता. शिरुर येथून २० जुलै २०२४ रोजी एका चौदा वर्षीय युवतीचे अपहरण झाल्याची घटना घडलेली असताना पोलीस स्टेशन येथे याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे व पोलीस हवालदार प्रताप कांबळे या गुन्ह्याचा तपास करत असताना अपहरण झालेली युवती परभणी येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी परभणी येथे जात युवतीसह त्याच्या सोबत असलेल्या दुर्गादास मकर याला ताब्यात घेतले, त्यांनतर युवतीकडे चौकशी केली असता दुर्गादास याने युवतीला लग्नाचे आमिष दाखवत तिला परभणी येथे घेऊन जात मंदिरामध्ये तिच्या गळ्यात हार घालत एका खोलीमध्ये ठेवून घेत तिच्यावर वारंवार अत्याचार केला असल्याचे युवतींनी पोलिस चौकशीत सांगितले असताना पोलिसांनी सदर अपहरण बाबतच्या गुन्ह्यामध्ये बाललैंगिक अत्याचार सह अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करत दुर्गादास रेशीम मकर रा. गंगाखेड ता. गंगाखेड जि. परभणी याला ताब्यात घेत अटक केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे व पोलीस हवालदार प्रताप कांबळे हे करत आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!