शिरूर शहरातील नागरिकांनी मालमत्ता व पाणीपट्टी कर भरण्याची केले आवाहन -मुख्याधिकारी प्रीतम पाटील

9 Star News
0
शिरूर,प्रतिनीधी
        शिरूर नगरपरिषदेच्या वतीने सर्व मालमत्ता धारकांनी सन 2024-2025 या आर्थिक वर्षातील व यापूर्वी असलेल्या थकबाकीदार यांनी मिळकती (घरपट्टी) वरील कर व पाणीपट्टी कर भरावा असे आवाहन मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी केले आहे.
         नगरपरिषदे मार्फत जुलै 2024 पर्यंत सर्व मिळकत धारकांचे घरपट्टी व पाणीपट्टी बिलांचे वाटप करण्यात आलेले आहे. तसेच नगरपरिषद अधिकारी कर्मचारी हे दैनंदिन प्रत्येक वॉर्ड निहाय घरोघरी जाऊन सदरील बिले भरणेबाबत जागृती करीत आहे. यामध्ये नागरिकांनी उशिरा मिळकत कर भरल्यास त्यांनी प्रति माह 2% व्याज दंडाच्या स्वरूपात भरावे लागू शकतात. त्याकरणाने सर्व मिळकत धारकांनी लवकरात लवकर मिळकत कर व पाणीपट्टी कर भरावे. 
    हा कर आपण घर बसल्या शिरूर नगरपरिषदेच्या Shirurnp.org या संकेत स्थळाला भेट देऊन आपल्या मालमत्तेवर किती कर आहे याबाबतची माहिती जाणून घेऊ शकतात. हे देयक G-Pay, Phone Pay, Paytm, किंवा सर्व प्रकारच्या कार्ड द्वारे ऑनलाइन स्वरूपात भरू शकता. किंवा शिरूर नगरपरिषदेच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत नागरी सुविधा केंद्रात भरणा करू शकता शिरूर नगरपरिषद हद्दीतील सर्व नागरिकांनी लवकरात लवकर आपले कडे असलेले मिळकत व पाण्याबाबतचे देयकातील रक्कमेचा ऑनलाइन अथवा नगरपरिषद कार्यालयात येऊन भरणा करून नगरपरिषदेस सहकार्य करून नगरपरिषदेच्या विकासकार्यात हातभार लावण्याचे आवाहन मुख्याधिकारी प्रितम पाटील यांनी केले आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!