शिरूर शहरात तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला तरुण गंभीर जखमी.... दोघांवर गुन्हा दाखल...

9 Star News
0
शिरूर दिनांक प्रतिनिधी 
      शिरूर जुने पुणे नगर महामार्गावर पोस्ट ऑफिस समोर नाझ ॲक्सेसरीज दुकाना बाहेर मागील भांडणाच्या कारणावरून तरुणावर कोयत्या सारख्या धारदार शास्त्राने जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी दोघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
          सैफ जमीर खान (वय २२ वर्षे, रा. भाजी बाजार, शिरूर, ता. शिरूर, जि. पुणे) हा याहल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे.
        असिफ खान (भाजी बाजार शिरूर ता.शिरूर जि.पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
         याबाबत आयन समीर शेख, हुसेन शहीद शहा दोन्ही (रा. फकीरा मोहल्ला शिरूर तालुका शिरूर जिल्हा पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून दिनांक २३ डिसेंबर २४ रोजी रात्री साडेदहा वाजता जुने नगर ते पुणे रोडवर शिरूर पोस्ट ऑफीस समोर नाझ अँटो अँक्सेसरिज दुकानाजवळ जुन्या तीन ते चार वर्षापासून जखमी सैफ व आरोपी हुसेन शहा यांच्यात वर्चस्वाच्या कारणावरून वाद होता व 17 डिसेंबर रोजी समीर शेख यांनी जखमी सैफ याच्या आईच्या दुकानासमोरत्याच्या दुकानासमोर केलेल्या गोंधळाच्या कारणावरून आरोपी आयान शेख यांनी हुसेन शहा यांच्या सांगण्यावरून हातातील कोयत्या सारख्या धारदार हत्याराने जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याचे डोक्यावर व हातावर वार करून त्याला गंभीर जखमी करून त्यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.
       याबाबत फिर्यादीवरून शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करीत आहे.
 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!