( प्रतिनिधी ) जातेगाव बुद्रुक ता. शिरुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेली यशवंतराव चव्हाण कला क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव स्पर्धेत सहभाग घेतला होता, सदर स्पर्धा नुकत्याच सादलगाव येथे पार पडल्या असून या स्पर्धेमध्ये जातेगाव बुद्रुक शाळेचा तालुकास्तरीय भजन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आला असल्याने शाळेची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याचे मुख्याध्यापक विजय गायकवाड यांनी सांगितले.
शाळेच्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर, शिक्षिका अंजली शिंदे यांचा सन्मान करण्यात आला, तर सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे सरपंच निलेश उमाप, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हनुमंतराव पवार, माजी सभापती सुभाष उमाप, प्रकाश पवार यांसह आदींनी अभिनंदन केले आहे.
फोटो खालील ओळ – जातेगाव बुद्रुक ता. शिरुर शाळेचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस वितरण करताना मान्यवर.