परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना घटनेचा निषेध करत तसेच सोमनाथ व्यंकटेश सूर्यवंशी या तरुण कार्यकर्त्याचा न्यायालयीन कोठडीत झालेल्या मृत्यूची सखोल चौकशी करून गुन्हेगारांना शिक्षा करावी या मागणीसाठी शिरूर शहर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने रस्ता रोको व धरणे आंदोलन व टायर जाळून निषेध व्यक्त केला आहे.
शिरूर शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार घालून विविध शिरूर नगर मंगल कार्यालय समोर रास्ता रोको आंदोलन करत आंदोलन करताना टायर जाळून या घटनेचा निषेध व्यक्त केला तर शिरूर तहसील कार्यालय येथे धरणे आंदोलन केले.
यावेळी लहुजी शक्ती सेनेचे सोनू काळोखे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख पोपट शेलार ,विशाल जोगदंड, अविनाश साबळे, अमित तराळ विश्वास पाटोळे, किरण दिवटे , पप्पू साठे बाळासाहेब राजगुरू, रवी साबळे, नानू भवाळ,राहुल शिंदे, वैभव तराळ ,रोहित जाधव, हर्षद कांबळे ,आदित्य डोळस, ओमकार पेने, सुबोध तराळ पियुष तरा शुभम जाधव दीक्षांत डोळस प्रमोद मांडवकर शाहीद शेख, सोनू शेख
मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.
भारतीय संविधानाचा विजय असो.... सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालाच पाहिजे..... या सरकारचा करायचं काय खाली डोके वर पाय... अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.