शिक्रापूर सह शिरूरचे नाव अशिया रेकॉर्ड बुक मध्येशेरखान शेख यांची सर्पमित्र म्हणून राष्ट्रीय पातळीवर नोंद

9 Star News
0
शिक्रापूर सह शिरूरचे नाव अशिया रेकॉर्ड बुक मध्ये
शेरखान शेख यांची सर्पमित्र म्हणून राष्ट्रीय पातळीवर नोंद
शिरूर 
(  प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर येथील सर्पमित्र शेरखान शेख यांनी काही दिवसांपूर्वी साप पकडण्यासाठी चांदीची स्टिक बनवलेली असून त्यांची यापूर्वी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली असताना आता शेरखान शेख यांच्या सह त्यांच्या चांदीच्या स्टिकची आशिया बुक रेकॉड या राष्ट्रीय पातळीवर नोंद झाली आहे.
                      शिक्रापूर ता. शिरुर येथील सर्पमित्र शेरखान शेख यांनी शेकडो सापांना जीवदान देत निर्सगात मुक्त केले असून काही दिवसांपूर्वी शेरखान शेख यांनी साप पकडण्यासाठी छंद म्हणून अर्धा किलो वजनाची चांदीची स्टिक बनवल्याने ते चांगलेच चर्चेत आलेले असताना त्यांची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व ओएमजि बुक रेकॉर्ड मध्ये झालेली असताना शेरखान शेख यांचे मित्र दत्ता कवाद यांच्या विशेष प्रयत्नातून शेरखान यांची राष्ट्रीय पातळीवरील आशिया बुक रेकॉड मध्ये शेरखान शेख सह त्यांच्या चांदीच्या स्टिकची नोंद झाली असून त्याबाबतचे प्रमाणपत्र त्यांना प्राप्त झाले आहे, तर याबाबत बोलताना माझ्या नावाची नोंद राष्ट्रीय पातळीवर गेल्याचा आनंद वाटत असल्याचे शेरखान शेख यांनी सांगितले तर आमच्या मुलाचे नाव देशाच्या बाहेर पोहचल्याचा अभिमान वाटत असल्याचे शेरखान यांचे वडील सिकंदर शेख व आई जरीना शेख यांनी सांगितले, तर शेरखान शेख यांच्या सह त्यांच्या स्टिकची राष्ट्रीय पातळीवर नोंद झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
फोटो खालील ओळ – शिक्रापूर ता. शिरुर येथील राष्ट्रीय पट,पातळीवर नाव नोंदवणारे शेरखान शेख.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!