शिरूर बसस्थानक येथील सुलभ शौचालय हे महिलांसाठी मोफत असतानाही प्रवासी महिलांकडून पाच रुपये जबरदस्तीने घेत असून हे पैसे न देणाऱ्या महिलांना शिवीगाळ आरेरावी करीत आहे याबाबत शिरूर एसटी बस स्थानकाच्या व्यवस्थापकांना सांगून सुद्धा कुठलीही कारवाई करीत नसल्याचे निषेधार्थ रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राणीताई कर्डिले यांनी ३ जानेवारी २०२५ सावित्रीबाई फुले जयंती दिवशीपासून अमरण उपोषणाता करणार असल्याचा इशारा दिला आहे.
याबाबतचे निवेदन त्यांनी शिरूर एसटी बस आगार व्यवस्थापक मनिषा गायकवाड यांना दिले आहे. यावेळी राणीताई कर्डिले व डॉ वैशाली साखरे उपस्थित होते.
शिरूर एसटी बसस्थानकात असलेले महिला सुलभ सौचालयाची अवस्था अतिशय दयनीय झाली असून अस्वच्छतेचा कहर झाला आहे.दरवाजे बंद आहेत,खिडक्या तुटलेल्या आहेत ,कचरा टाकण्यासाठी मोठी डसबिन नाही. पाण्याचे नळ यांना तोट्या नाही,पुरेसे पाणी नाही,अनेक समस्या असून, या ठिकाणी महिला शौचालयाच्या ठिकाणी महिला कामगार आवश्यक आहे परंतु या ठिकाणी महिला कामगार नसल्याने पुरुष कामगार या ठिकाणी सुलभ शौचालयाच्या वतीने ठेवण्यात आला आहे. हा कामगार अनेक महिलांना अरेरावी करून तेथे बाहेरगावाहून येणारे महिला प्रवासी शौचालयात आले तर त्यांना पाच रुपये द्यावेत लागतील नाहीतर शौचालयात जाता येणार नाही अशी आरेरावी हा कर्मचारी करत आहे. शौचालय महिलांसाठी मोफत असते. या अगोदर हे शौचालय मोफत होते. शिरूर बस स्थानकाचे नवीन बांधकाम झाल्यानंतर या शौचालय पैसे का? असा सवाल ही व्यक्त करण्यात आला आहे.
यामुळे येथे येणाऱ्या प्रवासी महिलांची कुचंबना होत असून, अनेक वेळा शिरूर बस स्थानकाच्या व्यवस्थापकास निवेदन देऊन समक्ष भेटून सांगूनही कुठल्याही प्रकारचे त्यांच्यामध्ये बदल झालेला दिसून येत नाही. यामुळे 3 जानेवारी 2025 रोजी पासून शिरूर बस स्थानक व्यवस्थापक व सुलभ शौचालयाच्या ठेकेदार यांच्या विरोधात आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशी संस्थेचे अध्यक्ष राणीताई कर्डिले यांनी दिला आहे.