शिरूर शहरात फायरिंग करून तसेच गावठी पिस्तुल जवळ बाळगुन दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुंडास एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले असल्याची माहिती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली आहे.
शिरूर पोलीस स्टेशन मध्ये 25 दिवसात स्थानबद्धची दुसरी कारवाई झाल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.
वैभव नितीन भोईनल्लु (वय २४वर्षे रा. कामाठीपुरा शिरूर ता. शिरूर जि. पुणे) असे एक वर्षासाठी स्थानबद्ध केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.
शिरूर शहरातील सराईत गुन्हेगारांवर स्थानबद्धतीची कारवाई करण्यासाठी प्रस्ताव पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी मागवला होता. यावेळी शिरूर शहरात बेकायदेशीर जमाव जमवणे, गंभीर मारहाण करणे, रिवाल्वर चा वापर करणे, खुनाचा प्रयत्न असे पाच गंभीर गुन्हे तसेच रेकॉर्ड वरील गुन्हेगार वैभव भोईनल्लू याचा प्रस्ताव शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठवण्यात आला होता. तेथून तो पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आला
यावर निर्णय देताना त्याच्यावर पुणे जिल्हाधिकारी यांनी एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.
. वैभव भोईन्नल्लू याला एक वर्षासाठी अमरावती जिल्हा कारागृह अमरावती येथे जमा करून स्थानबध्द केले आहे. या कारवाई करीता अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, शिरूर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक हणमंतराव गिरी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार महेश बनकर, पोलीस हवालदार रामदास बाबर, शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार परशूराम सांगळे व पोलीस अमंलबार सचिन भोई, यांनी कामकाज पाहीले आहे.