परभणी येथील संविधान प्रतिकृतीची विटंबना व सोमनाथ सूर्यवंशी तरुणाचा मृत्यू दोन्ही घटनेचा शिरूर मध्ये मोर्चा काढून निषेध

9 Star News
0
शिरूर प्रतिनिधी
       परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना घटनेचा निषेध करत तसेच सोमनाथ व्यंकटेश सूर्यवंशी या तरुण कार्यकर्त्याचा न्यायालयीन कोठडीत झालेल्या मृत्यूचा निषेध करत आज शिरूर शहरातील विविध संघटनांनी व भीम अनुयायांनी मोर्चा काढत या दोन्ही घटनेचा निषेध करून या आरोपींवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली. तर या घटनेच्या निषेधार्थ शिरूर शहर भीम अनुयायांच्या वतीने उद्या दिनांक १७ डिसेंबर रोजी शहर बंद ठेवण्याचे जाहीर केले.
       शिरूर शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार घालून विविध संघटनांनी व भीम अनुयायांनी निषेध मोर्चा काढला यावेळी शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना निवेदन देण्यात आले.
        यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती चे माजी अध्यक्ष रमेश गायकवाड, नगरसेवक विनोद भालेराव,माजी नगरसेविका मायाताई गायकवाड, डॉ . संतोष पोटे,दादा लोखंडे,वैशाली साखरे, सविता बोरुडे, प्रिती बनसोडे, मंगल गायकवाड, वैशाली कांबळे, भीम छावा संघटनेचे चेतन साठे, आरपीआयचे शहराध्यक्ष निलेश जाधव, नितीन काळे, बबन कांबळे, प्रमोद कांबळे, अविनाश शिंदे, तुषार बदाने, ॲड.यमराज शिंदे, ॲड अमित खेडकर, विशाल ससाणे, प्रकाश डंबाळे ,आदित्य उबाळे,
व मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते. 
       दिनांक १० डिसेंबर रोजी परभणी येथे भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना काही समाजकंटकांनी करू समाजामध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे तर या घटना आंदोलन करणाऱ्या व त्यात अटक केलेल्या परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबनेच्या घटनेचा निषेध करत, घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंद दरम्यान पोलिसांनी सोमनाथ व्यंकटेश सुर्यवंशी या तरुण कार्यकर्त्याला पोलिसांनी अटक केली होती, व त्यास न्यायालयीन कोठडीच मृत्यु झाल्याची धक्कादायक प्रकार घडला असून, यामुळे नागरिकांच्या भावना संतप्त झाले आहेत. तरी संबंधित आरोपींवार कडक कारवाई करावी तर सूर्यवंशी यांच्या हत्येतील आरोपींची चौकशी करून त्यांच्यावरही कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. या दोन्ही घटनेच्या निषेधार्थ उद्या दिनांक 17 डिसेंबर रोजी शिरूर शहर बंद ठेवण्यात येणार असून याची दखल पोलीस व तहसील कार्यालय यांनी घ्यावी अशी मागणी करण्यात आली.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!