विवाहितेला माहेरून दहा तोळे सोने आन, लग्नात तुझ्या वडिलांनी मानपान केला नाही, तुला स्वयंपाक येत नाही असे म्हणून मारहाण करून उपाशीठेवून शिवीगाळ दमदाटी केल्याप्रकरणी पती सासू दीर मावस सासू व मावस दीर यांच्यावर छळवणूक प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकांक्षा शुभम मुळे (वय 22 वर्ष व्यवसाय करताना राहणार किन्ही तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी शुभम शिवाजी मुळे, कांचन शिवाजी मुळे, सुजित शिवाजी मुळे (रा. किन्ही ता. पारनेर जिल्हा अहिल्यानगर ), काळुबाई काटे,ओंकार काटे ,(रा. पिंपळे गुरव तालुका पिंपरी चिंचवड जिल्हा पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक २१ सप्टेंबर २०२४ ते दिनांक १३ डिसेंबर २४ दरम्यान पती ,सासू, दीर, पतीची मावशी, मावस दीर हे सर्वजण विवाहितेला तुला स्वयंपाक येत नाही. तुझ्या बापाने लग्नात मानपान केला नाही, लग्नात तुझ्या बापाने सोने दिले नाही तू माहेरून दहातोळी सोनी घेऊनी असे म्हणून विवाहितेला शारीरिक व मानसिक शहर करून उपाशीपोटी ठेवून शिवीगाळ दमदाटी , मारहाण करून,तिची छळवणूक केल्याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास याबाबत शिरूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार मोरे करत आहे.