शिक्रापुरात माजी उपसरपंचाचा खून करणारा जेरबंद शिक्रापूर पोलिसांच्या पथकाची कामगिरी

9 Star News
0
शिक्रापुरात माजी उपसरपंचाचा खून करणारा जेरबंद
शिक्रापूर पोलिसांच्या पथकाची चक्क बारा तासात कामगिरी
शिरूर ( प्रतिनिधी ) 
शिक्रापूर ता. शिरुर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच दत्तात्रय बंडू गिलबिले यांचा जुन्या वादाच्या कारणातून भरदिवसा धारदार शस्त्राने खून करुन फरार झालेल्या आरोपीला शिक्रापूर पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पुणे परिसरातून बारा तासात जेरबंद केले आहे.
         पप्पू नामदेव गिलबिले (कोयाळी पुनर्वसन शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे)असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे.
    दत्तात्रय बंडू गिलबिले (वय ५२ रा. कोयाळी पुनर्वसन शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांची हत्या करण्यात आली होती.
           याबाबत रोहिणी दत्तात्रय गिलबिले (वय ४२ रा. कोयाळी पुनर्वसन शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्याद दिली.
                         शिक्रापूर ता. शिरुर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच व शिवंसेना शिंदे गटाचे जिल्हा सल्लागार दत्तात्रय बंडू गिलबिले व पप्पू गिलबिले याची पत्नी दोघांमध्ये मोबाईल वरुन चाटिंग होत असल्याने काही दिवसांपूर्वी वाद झालेले होते, त्यांनतर रविवार १ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास दत्ता गिलबिले घराच्या काही बसलेले असताना अचानकपणे आलेल्या पप्पू गिलबिले याने धारदार शस्त्राने दत्तात्रय यांच्या मानेसह अंगावर करुन दुचाकीहून पळून गेला, दरम्यान नागरिकांनी दत्तात्रय गिलबिले यांना उपचारासाठी शिक्रापूर येथील खाजगी रुग्णालयात नेले मात्र उपचारापूर्वी दत्तात्रय बंडू गिलबिले वय ५२ रा. कोयाळी पुनर्वसन शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांचा मृत्यू झाला, याबाबत रोहिणी दत्तात्रय गिलबिले वय ४२ रा. कोयाळी पुनर्वसन शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पप्पू नामदेव गिलबिले रा. कोयाळी पुनर्वसन शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला दरम्यान पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, पोलीस हवालदार विकास पाटील, रोहिदास पारखे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस हवालदार जनार्दन शेळके, तुषार पंधारे, संजू जाधव यांनी फरार पप्पू चा शोध घेत चाकण तसेच पुणे परिसरात सापळे लावले मात्र पप्पू वारंवार जागा बदलत असल्याने अडचणी येत होत्या मात्र खराडी भागात अचानकपणे सिगारेट घेऊन उभ्या असलेल्या पप्पूला पोलिसांनी ओळखत जेरबंद केले, यावेळी त्याने गुन्ह्याची कबुली देखील दिली असून यापूर्वी झालेल्या वादानंतर दत्तात्रय नेहमी रागाने पाहणे, रस्त्यामध्ये वाहन उभे करणे असे प्रकार करत असल्याने आपण सदर गुन्हा केल्याचे पप्पू गिलबिले याने पोलिसांना सांगितले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय मस्कर हे करत आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!