नीर्वी ता. शिरूर कणसे वस्ती येथे भरधाव वेगात आलेला ट्रॅक्टर कोपीमध्ये(झोपडीत) घुसून झालेल्या अपघातात कोपी मध्ये झोपलेले ऊसतोडणी कामगार पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून पोलिसांनी ट्रॅक्टर ड्रायव्हरवरला अटक करुन गुन्हा दाखल केला आहे .
गणपत कचरू वाघ (वय ४६ वर्ष),शोभा गणपत वाघ (वय ४१ वर्ष दोघे राहणार ममदापुर तालुका येवला जिल्हा नाशिक ) या पती पत्नी यांचा मृत्यु झाला आहे.
दीपक गणपत वाघ (वय 19 वर्षों, धंदा मजुरी रा ममदापूर तालुका येवला जिल्हा नाशिक ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
राहूल अण्णा सोनवणे(रा .निर्वि ता. शिरूर) या ट्रॅक्टर ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून निर्वी ता.शिरूर कणसे वस्ती विलास सोनवणे यांच्या जमिनीच्या शेजारी कॅनल पट्टी जवळ फिर्यादी यांच्या आई वडिलांची कोपी असून ते ऊस तोडणी करिता या भागात आले होते.,दिनांक १६ डिसेंबर रोजी जेवण करून मयत पती-पत्नी त्यांच्या गोपी मध्ये झोपले असताना मध्यरात्री एक ते तीन वाजण्याच्या दरम्यान फिर्यादीचे आई-वडील घरात झोपले असताना आरोपीने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर नंबर एम एच १२ ई बी ४५५८ निष्काळजीपणाने, भरधाव वेगात फिर्यादी यांचे आई वडील राहत असलेल्या कोपीवर जाऊन ट्रॅक्टर बाजूच्या कॅनॉल मध्ये जाऊन पडला होता यात ट्रॅक्टरचे चाक फिर्यादी यांचे वडिल गणपत यांच्या पोटावरून गेल्याने तसेच आई शोभा गणपत वाघ यांच्या तोंडावरून गेल्याने ते जागीच मयत झाले.
याबाबत शिरूर पोलिसांनी फिर्यादीवरून ट्रक ड्रायव्हर याच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनची पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर शेळके करीत आहे.