शिरूर शहरात उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर नगरपरिषद करणार दंडात्मक कार्यवाही - प्रीतम पाटील

9 Star News
0
शिरूर दिनांक प्रतिनिधी 
        शिरूर नगरपरिषद हद्दीमध्ये उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर शिरूर नगर परिषदेच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा शिरूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी दिला आहे. 
       शिरूर शहराच्या प्रत्येक भागामध्ये नगर परिषदेच्या वतीने कचरा संकलन करण्यासाठी घंटागाडी येत असून या घंटागाडी मध्ये नागरिक कचरा टाकत आहेत परंतु काही नागरिक आपला कचरा हा पटांगण, कोपरे, अडगळीच्या जागा या ठिकाणी टाकत असून, यामुळे शहराचे विद्रूपीकरण होत आहे, जर आपल्या भागामध्ये घंटागाडी येत नसेल तर शिरूर नगरपरिषद स्वच्छता विभाग यांच्याकडे तक्रार करावी, परंतु घंटागाडी येऊनही कचरा मुद्दामहून मोकळ्या जागेमध्ये जर टाकत असाल तर तुमच्यावर आता शिरूर नगरपरिषदेच्या पथकाची करडी नजर राहणार आहे. असा नागरिक कचरा टाकताना आढळून आल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
        यासाठी शिरूर नगरपरिषदेचे वतीने या कार्यवाहीसाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आले असून या पथकामार्फत शिरूर शहरातील सिताबाई थिटे कॉलेज जवळ पुणे-नगर बायपास, रामलिंग रोड, जोशिवाडी दाटवड, पांजरपोळ समोरील भाग, गोलेगाव रोड, प्रीतम प्रकाश नगर चे पटांगण या ठिकाणी तसेच शहरातील विविध भागात उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर करडी नजर ठेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. 
     शिरूर शहरातील सर्व नागरिकांनी आपला कचरा उघड्यावर न टाकता नगरपरिषदेच्या घंटागाडीमध्ये ओला सुका वेगवेगळा देण्याचे आवाहन केले असून उघड्यावर कचरा टाकताना आढळल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे ही मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी सांगितले.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!