पुणे जवळ वाघोली येथील केसनंद फाट्याजवळ दारूच्या नशेत भरधाव वेगात डंपर चालवून फुटपाथ वर झोपलेल्या ९ जणांना चिरडले असून, तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे यात दोन चिमुकल्याचा समावेश आहे तर सहाजण गंभीर जखमी आहेत. तर या अपघातीतील डंपर चालक याला पोलिसांनी अटक केली आहे.
कडाक्याच्या थंडीमध्ये एक व दोन वर्षांची मुले फुटबॉल आईच्या कुशी झोपली असतानाच हा अपघात झाला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला त्यांची मृत्यू देह पाहून वाघोली पोलीस आणि नागरिक ही गहिवरले.
वाघोली येथे मजुरीसाठी आलेल्या या गरीब कुटुंबावर रात्री काळाने घाला घातला असून, हे संपूर्ण कुटुंब आता उघड्यावर पडले आहे यासाठी शासनाने त्वरित मदतीचा हात द्यावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.
वैभवी रितेश पवार (वय १), वैभव रितेश पवार (वय २), रीनेश नितेश पवार, (वय ३०) अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर जानकी दिनेश पवार (वय २१) रिनिशा विनोद पवार (वय १८), रोशन शशादू भोसले (वय ९), नगेश निवृत्ती पवार (वय २७), दर्शन संजय वैराळ (वय १८), आलिशा विनोद पवार (वय ४७) अशी जखमींची नावे आहेत.
डंपर चालक गजानन शंकर तोट्रे (वय २६, रा. नांदेड) यास अटक करण्यात आली आहे.
या घटनेमुळे पुणे व पुणे परिसरत ड्रंक अँड ड्रायरच्या घटना सुरूच असल्याचे दिसून येत आहे
ही घटना रविवारी रात्री रात्री १२ ते १ च्या सुमारास वाघोलीतील केसनंद फाट्याजवळ घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील पमाणे वाघोली केसनंद फाटा येथे रविवारी रात्रीच मजूर अमरावती येथून बिगारी व मजुरी कामासाठी वाघोली येथे आले होते. एका कुटुंबातील १२ जण फूटपाथवर जेवण करून झोपले होते. तर आणखी काही जण फूटपाथच्या बाजूला झोपड्यांमध्ये झोपले होते. यातील काही जण हे बाहेरील राज्यातील आहे.
पुण्यात वाघोली केसनंद फाटा येथे काही मजूर ही रस्त्याच्या पलीकडे फुटपाथवर झोपले होते. रविवारी रात्री बारा ते मध्यरात्री एकच्या दरम्यान डंपर चालक (क्रमांक MH 12 VF 0437) गजानन शंकर तोट्रे याने मद्यधुंद अवस्थेत फुटपाथवर झोपलेल्या लोकांवर डंपर चढवला. हा डंपर बिल्टवेस् इंटरप्राईजेस कंपनीचा होता. तर पोलिस ठाण्याच्या काही अंतरावर हा अपघात झाला. या घटनेत डंपरने फूट पाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडले. या मध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच रस्त्यावर नागरिकांनी देखील मदतीसाठी धाव घेतली.
जखमींवर आयनॉक्स हॉस्पिटल येथे प्राथमिक उपचार करून ससून रुग्णालयात पाठवण्यात आले. तर मृतदेह आयनॉक्स हॉस्पिटल येथून ससून येथे पाठवण्यात आले आहेत. आरोपीविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून यात तो दारू प्यायल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंडित रेजितवाड करत आहेत.
डंपर चालक गजानन शंकर तोट्रे (वय २६, रा. नांदेड) यास अटक करण्यात आली आहे.
त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी ससून हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले आहे.