शिरूर तालुक्यातील पूर्व भागात पिंपळसूटी येथेा बिबट्याने हल्ला चार वर्षीय चिमुरडीला दुर्दैवी मृत्यू...

9 Star News
0
शिरूर दिनांक प्रतिनिधी 
        शिरूर तालुक्यातील पूर्व भागात पिंपळसूटी येथे पुन्हा एकदा बिबट्याने हल्ला करून चार वर्षीय चिमुरडीला आई समोरच फडफडत नेले असल्याची घटना घडली असून, दोन तासानंतर चिमुरडी चा मृत्यूदेह लचके तोडलेल्या अवस्थेत सापडला आहे. शिरूर तालुक्यातील पूर्व भागात तिसऱ्या चिमुरडीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला असल्याने नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.
         मुलीचा मृतदेह पाहतात मुलीचे आई-वडील व नातेवाईकांनी टाहो फोडल्याने परिसरातील महिला नागरिक गहिवरले होते. या बिबट्याच्या हल्ल्यात चिमूरडीचे धड व डोके वेगळे झाले असल्याने पुन्हा एकदा मांडवगण फराटा येथे १५ नोव्हेंबर रोजीचा शिवतेज टेंभेकर या पाच वर्षे मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या घटनेची आठवण झाली आहे.
           रक्षा अजय निकम (वय ४ वर्षे रा. पिंपळसुटी ता शिरूर)असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या चार वर्षीय चिमुरडीचे नाव आहे.
      ही घटना 24 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान घडली आहे.
             शिरूर तालुक्यातील पिंपळसूटी येथील नदीकिनारी दशक्रिया घाटाजवळ राहणारे निकम कुटुंब यांची चार वर्षीय मुलगी अंगणात खेळत होती तर आई लाईट गेल्याने दुसऱ्या मुलाला जेऊ घालत असतात अचानक आई समोरच बिबट्याने हल्ला करून चिमुरडीला शेतामध्ये फरपटत नेले असल्याची घटना घडली आईने त्याच्या मागे जाण्याचा प्रयत्न केला परंतु बिबट्या तिला ओढत लांब घेऊन गेला त्यानंतर आईने आरडाओरडा केला त्यानंतर नागरिक जमा झाले व मोठ्या प्रमाणात नागरिक मुलीचा शोध घेत होती वन खात्याची कर्मचार या ठिकाणी येऊन मुलीचा शोध सुरू केला जवळपास दोन ते अडीच तासाने चिमुरडीचा मृत्यू देह आढळला आहे. वन खात्याच्या वतीने मृत्यूदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात मृतदेह नेण्यात आला आहे.
. शिरूर तालुक्यातील पूर्व भागात या अगोदर मांडवगण फराटा येथे दोन लहान मुलांना नातेवाईकांसमोर बिबट्याने हल्ला करून ठार मारले आहे. त्यानंतर ही पूर्व भागातील तिसरी घटना आहे . त्यात या लहान चिमुरडी चा मृत्यू झाला आहे. 
          या अगोदर मांडवगण वडगाव रासाई परिसरात वन विभागाने वीस पिंजरे बिबट्या पकडण्यासाठी लावली होती त्यात मांडवगण फराटा वडगाव रासाई परिसरात दोन तर रांजणगाव चांडस परिसरात दोन बिबटे जेरबंद झाले आहे.
                मांडवगण फराटा या परिसरात रोज बिबट्याचा वावर असून गेल्या आठ दिवसात एका दिवसाच्या पाठीमागे बिबट्या लागला होता तर दोन पशुधनाचा बळीही त्यांनी घेतला होता. 
                 मांडवगण फराटा येथे दोन मुलांचा जीव घेणाऱ्या नरभक्ष बिबट्यानेच हा हल्ला केला तर नाही ना अशी शंका वन विभागाला आहे. 
       पिंपळसूती या गावात जवळ नदीकिनारी हे निकम कुटुंब राहत असून मजुरीचे काम करीत आहे या दुर्दैवी घटनेमुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
         शिरूर तालुक्यातील पूर्व भागात बिबट्यांची संख्या मोठी असून, मांडवगण फराटा नंतर पिंपळसूटी या जवळच असणाऱ्या गावात नरभक्षक बिबट्याने चिमुरडीवर हल्ला केला आहे. या हल्ल्याची रक्षा चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने नागरिक व शाळकरी मुलांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. या बिबट्याला पकडण्यासाठी तात्काळ वन विभागाने पिंजरे लावावे अशी मागणी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची माजी संचालक शशिकांत वेताळ यांनी केली आहे.         


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!