शिरुर वनविभागाने खबरदारी घेत तातडीने लावला पिंजरा
( प्रतिनिधी ) करंदी ता. शिरुर येथील झेंडे वस्ती व नप्ते वस्ती परिसरात दोन बिबट्या घराच्या अंगणात येऊन कुत्र्यावर हल्ला करताना सीसीटीव्ही मध्ये कैद झालेले असताना परिसरात दोन बिबट्यांचा मुक्त संचार दिसून आल्याने वनविभागाने खबरदारी घेत तातडीने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला आहे.
करंदी ता. शिरुर येथील झेंडे वस्ती येथे राहुल ढोकले यांच्या घराच्या बाहेर २६ डिसेंबर रोजी रात्री तीन वाजण्याच्या सुमारास कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज आल्याने राहुल यांनी घराबाहेर पाहिले असता दोन बिबटे दारासमोरील पायरी समोर असल्याचे दिसले त्यांनतर सीसीटीव्ही तपासले असता सर्व प्रकार समोर आला, याबाबतची माहिती शिरुर वनविभागाच्या वनपरिमंडल अधिकारी गौरी हिंगणे यांना मिळताच वनपरिक्षेत्र वनअधिकारी बबन दहातोंडे, वनमजूर आनंद हरगुडे, रेस्क्यू टीमचे गणेश टिळेकर, शेरखान शेख, अमोल कुसाळकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत पाहणी करुन नागरिकांची मागणी लक्षात घेता तातडीने पिंजरा लावला, यावेळी पोलीस पाटील वंदना साबळे, सामाजिक कार्यकर्ते राहुल ढोकले, महेश साबळे पाटील, समीर ढोकले, गणेश झेंडे, सुनील ढोकले, सोमनाथ सातपुते, अभिजित पऱ्हाड, अरुण सातपुते यांसह आदी उपस्थित होते, तर २७ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास बिबट्याने पुन्हा कांताराम नप्ते यांच्या घरासमोर फेरफटका मारल्याचे दिसून आल्याने खळबळ उडाली आहे, दरम्यान परिसरातील नागरिकांनी रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, मुलांना बाहेर एकटे सोडू नये, शेतात जाताना आवाज करावा, जनावरांना योग्य निवारा करावा, घराबाहेर लाईत चालू ठेवावी असे आवाहन नियतक्षेत्र वनअधिकारी बबन दहातोंडे यांनी केले आहे.
स्वतंत्र चौकट १ –
करंदी येथे बिबट्या एका बछडयासह फिरत असल्याचे सीसीटीव्ही व्हिडीओच्या माध्यमातून दिसून आलेले असताना बिबट्यांच्या पावलांचे ठसे देखील परिसरात असल्याने आम्ही तेथे पिंजरा लावत नागरिकांना योग्य सूचना केल्या असल्याचे नियतक्षेत्र वनअधिकारी बबन दहातोंडे यांनी सांगितले.
फोटो खालील ओळ – करंदी ता. शिरुर येथे सीसीटीव्हीमध्ये कैद बिबट्यांचा मुक्त संचार व वनविभागाने लावलेला पिंजरा.