पारोडी ता. शिरुर येथील महिला गावातील चौकाजवळ असताना तरुणाने मित्रांसह येत महिलेचा विनयभग करून तिला कोयत्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पाच जणांवर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पीडित महिलेने फिर्याद दिली आहे.
अभिषेक बाळासाहेब टेमगिरे (रा.पारोडी ता. शिरुर जि. पुणे) याच्या सह त्याच्या चार अनोळखी साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
पारोडी ता. शिरुर येथील महिला गावातील चौकाजवळ असताना अभिषेक टेमगिरे याने महिलेच्या मनास लज्जा निर्माण होईल असे वर्तन करत महिलेचा विनयभंग केला तर यावेळी अभिषेक सोबत असलेल्या त्याच्या चार साथीदारांनी महिलेला शिवीगाळ, दमदाटी करत महिलेला कोयता दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली, घडलेल्या प्रकाराबाबत पिडीत महिलेने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अभिषेक बाळासाहेब टेमगिरे ता. पारोडी ता. शिरुर जि. पुणे याच्या सह त्याच्या चार अनोळखी साथीदारांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार संदीप इथापे हे करत आहे.