पिंपळसुटी ता.शिरूर येथे श्रीगोंदा पिंपळसूटी या मुक्कामी एसटी बस मधून चोरट्यांनी 130 लिटर डिझेल चोरून नेले असून याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशाप्रकारे मुक्कामी एसटी बस चे डीझेल चोरी होत असेल तर एसटी महामंडळ मुक्कामी एसटी सोडणार नाही त्यामुळे प्रवासी शालेय विद्यार्थी यांचे मोठे हाल होतील.
ही २७ डिसेंबर घटना मध्यरात्री घडली आहे. श्रीगोंदा एसटी बस स्थानकाची बस क्रमांक एम एच १४ बी टी ०८७३ श्रीगोंदा वरून पिंपळसूटी येते मुक्कामी आली होती. ती ग्रामपंचायत कार्यालयासमोर उभी केली असताना मध्यरात्री ३ वाजता काही अज्ञात चोरट्यांनी या बसमधील 130 लिटर डिझेल किंमत ११हजार ८०० रूपये चोरून नेले आहे.
सदर चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरे कैद झाली असून, चार चोरट्यांनी स्कॉर्पिओ गाडीमध्ये येऊन हे डिझेल चोरून नेल्याची दिसत आहे.
अशाप्रकारे मुक्कामी एसटी बसचे डिझेल चोरी गेले तर एसटी महामंडळा बरोबर नागरिकांनाही त्याचा फटका बसत आहे. अशा चोरट्यांना लवकरात लवकर पोलिसांनी जेरबंद करावे अशी मागणी नागरिक प्रवासी व एसटी महामंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत श्रीगोंदा पिंपळसूटी बसचे चालक रामदास कोळेकर यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.