शिरूर
( प्रतिनिधी ) रांजणगाव गणपती ता. शिरुर येथील एका कंपनीच्या व्यवस्थापकाला अज्ञात व्यक्तीने फोन करुन मी कंपनीचा सिओ असल्याचे भासवून तब्बल दोन लाखांना गंडा घातल्याची घटना घडली असल्याने रांजणगाव एमआयडीसि येथे अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत आकाश उमाचरण मित्तल (वय ५४ वर्षे रा. एमेनोरा टोवर पुणे) यांनी रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
रांजणगाव गणपती ता. शिरुर येथील एका कंपनीच्या हेड ऑफिसर असेलल्या आकाश मित्तल यांना एका व्यक्तीने फोन करुन मी तुमच्या कंपनीचा सिओ असल्याचे भासवून त्याला एक नंबर देऊन त्या नंबरवर दोन लाख रुपये पाठवण्यास सांगितले, त्यांनतर कंपनी मधील सि ओ असलेल्या राजेश खत्री यांनी कोणत्याही प्रकारचे पैसे घेतले नसून कोणालाही पैसे पाठवायला सांगितले नसल्याचे समोर आल्यानंतर आकाश मित्तल यांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्याने, याबाबत आकाश उमाचरण मित्तल वय ५४ वर्षे रा. एमेनोरा टोवर पुणे यांनी रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय सरजीने हे करत आहे.