( प्रतिनिधी ) कर्डेलवाडी ता. शिरुर येथील टायको पेक कंपनी समोरील विद्युत पुरवठा रात्रीच्या सुमारास अचानक बंद झाल्याने विद्युत वितरणचे काही कर्मचारी सदर ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांना त्या ठिकाणचे विद्युत रोहित्र जमिनीवर पडलेले आणि त्यातील तांब्याच्या तारा गायब असल्याचे निदर्शनास आले, याबाबत विद्युत वितरण विभागाचे कर्मचारी महादेव प्रकाश मोरे वय ३३ वर्षे रा. बाबुराव नगर शिरुर ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. पडसाळी ता. माढा जि. सोलापूर यांनी रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार अभिमान कोळेकर हे करत आहे.
कर्डेलवाडीत विद्युत रोहित्राच्या तांब्याच्या तारा चोरी
डिसेंबर २०, २०२४
0
कर्डेलवाडीत विद्युत रोहित्राच्या तांब्याच्या तारा चोरी
Tags