शाश्वत गुणवत्तेसाठी शिक्षकांनी कटिबद्ध रहावे – डॉ. भाऊसाहेब कारेकर

9 Star News
0
शाश्वत गुणवत्तेसाठी शिक्षकांनी कटिबद्ध रहावे – डॉ. भाऊसाहेब कारेकर
शिरूर 
( प्रतिनिधी ) शालेय निरीक्षण व पर्यवेक्षण या दृष्टीने शिक्षण विभागातील विविध बाबींना स्पर्श करणारा हा उपक्रम असून गुणवत्तेच्या दृष्टीने पारंपारिक व आधुनिक बाबींचा उल्लेख शिक्षण वाटचालीत समावेश असावा या हेतूने सदर अभियान राबविण्यात येत असून शाश्वत गुणवत्तेसाठी शिक्षकांनी कटिबद्ध रहावे असे प्रतीपादन पुणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी केले.
                           वढू बुद्रक ता. शिरुर येथील धर्मवीर शंभूराजे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय येथून पुणे जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ व पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान २०२४ ते २०२५ अभियानाची सुरुवात पुणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांच्या हस्ते करण्यात आली, याप्रसंगी तपासणी पथकाचे प्रमुख स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य व प्राचार्य अनिल साकोरे, जितेंद्रकुमार थिटे, अशोकराव भंडारे, मुख्याध्यापक एकनाथ चव्हाण, ज्येष्ठ शिक्षक विलासराव कुरकुटे, सोमनाथ भंडारे, पोपट वनवे, मिठू सोनवणे यांसह आदी उपस्थित होते, सदर गुणवत्ता विकास अभियानात मुलांची गुणवत्ता वाढ, दैनंदिन परिपाठ, शाळेचा परिसर, शाळेची स्वच्छता, दैनंदिन अध्यापन, प्रगत अप्रगत विद्यार्थ्यांसाठी शाळेने केलेले प्रयत्न, शाळेची भौतिक सुविधा, मुला मुलींचे प्रमाणात असणारी शौचालय सुविधा, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, प्रहारी गट, विविध समित्या, विद्यार्थी वाहतूक व्यवस्था, शालेय दप्तर यांसह आदी बाबींची तपासणी होत आहे, दरम्यान शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालयात आल्यानंतर निसर्गमय परिसर व वृक्षांची निगा प्रत्येक वृक्षांना दिलेला स्कॅनर आणि स्कॅनर डाऊनलोड केल्यानंतर वृक्षांची सर्व मिळणारी माहिती तसेच इयत्ता पाचवीची शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी व शाळेची गुणवत्ता पाहून पुणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी समाधान व्यक्त केले, सदर कार्यक्रमात पोपट वनवे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले व मिठू सोनवणे यांनी आभार मानले.
फोटो खालील ओळ – व हु बुद्रुक ता. शिरुर येथील विद्यालयाला भेट देताना पुणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!