( प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर येथील मुख्य चाकण चौकात असलेल्या एका पान टपरीसह परिसरातील आदी बोर्डला भीषण आग लागून नुकसान झाल्याची घटना घडली असून नागरिक व अग्निशामक दलाच्या प्रयत्नाने आग विझवण्यात यश आले आहे.
शिक्रापूर ता. शिरुर येथील मुख्य चाकण चौकात नादब्रम्ह इडली समोर असलेल्या पान टपरीला अचानक आग लागून बाहेरील फ्लेक्ससह पत्र्यांवर पडलेल्या झाडाच्या पाल्यामुळे आगीचे लोळ पसरल्याने आगीने रौद्ररुप घेतले, घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, पोलीस हवलदार लहानू बांगर, सुजित जगताप, नारायण वाळके, नादब्रम्ह इडली चालक सागर गायकवाड, सतीश सासवडे, महेश वाघ, वायरमन ज्ञानेश्वर पांडे यांसह आदींनी आग विझवण्याचे प्रयत्न सुरु केले, काही वेळात रांजणगाव औद्योगिक वसाहत येथील अग्निशामक दलाचे सुरेश गायकवाड, महेंद्र माळी, किशोर सांगळे, हनुमंत नागरगोजे, शुभम यादव यांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली, मात्र सदर घटनेत पान टपरीतील फ्रीज सह सर्व साहित्य जाळून खाक झाल्याने टपरी चालकाचे मोठे नुकसान झाले आहे.
फोटो खालील ओळ – शिक्रापूर ता. शिरुर येथे पानटपरीसह परिसराला लागलेली भीषण आग.