सादलगाव ता शिरूर येथे ऊसतोड हार्वेस्ट मशीन भरधाव वेगात रिव्हर्स चालून एका व्यक्तीस जोरदार धडक देऊ झालेल्या अपघातात ४३ पुरुषाचा मृत्यू झाला असून,याबाबत हार्वेस्टर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समाधन रंगनाथ बावस्कर (वय. ४३ वर्षे, रा . सादलगाव ता शिरूर,) यांचा अपघातात मृत्यू झाला आहे.
नंदा समाधान बावस्कर (वय. ४३ वर्षे, व्यवसाय. मजुरी, रा. सादलगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
याबाबत चालक शुभम पाडुरंग ढवळे (रा. तळईमळा, वडगाव रासाई, ता. शिरूर, जि. पुणे) याच्यावर गून्हा दाखल करण्यात आला आहे..
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे र्दिनांक. ०६ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास सादलगाव, ता. शिरूर, जि. पुणे येथील संजय लक्ष्मण होळकर यांचे शेतातील उसतोड हार्वेस्टर मशिन वरील चालकाने हार्वेस्टर मशिन हायगईने व अविचाराने भरधाव वेगात पाठीमागे चालवून फिर्यादीच्या पतीस धडक देवून त्यांचे पोटावरून चाक जावून गंभीर व किरकोळ दुखापत करून पती समाधन रंगनाथ बावस्कर वय. ४३ वर्षे यांचे मृत्यूस कारणीभूत झाला आहे. म्हणुन माझी हार्वेस्टर एम.एच.१२ व्ही.सी.०९६० वरील चालक विरोधात शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल झाली असून पुढील तपास सुरू पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गवळी करीत आहे.