तांदळी (ता.शिरूर) कळसकरवाडी येथे दुचाकीवरून पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन ३२ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.
प्रतिभा बाळासाहेब मदने (वय ३२,रा.डोंबाळेवस्ती,वांगदरी,ता.श्रीगोंदा,जि. अहिल्यानगर)असे या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत मोहन साहेबराव मदने वय ४२ वर्षे रा. रा. वांगदरी ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे खबर दिली.
काष्टी रोडने बाळासाहेब मदने व प्रतिभा मदने दोघे त्यांच्या जवळील दुचाकीहून चाललेले असताना कळसकर वाडी येथे रस्त्यावरील गतिरोधकवर दुचाकी आदळली जाऊन प्रतिभा मदने रस्त्यावर पाडून जखमी झाल्या, दरम्यान नागरिकांनी त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले असतान डॉक्टरांनी प्रतिभा बाळासाहेब मदने वय ३२ वर्षे रा. वांगदरी ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले, याबाबत मोहन साहेबराव मदने वय ४२ वर्षे रा. रा. वांगदरी ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे खबर दिल्याने पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश कदम हे करत आहे.