कारसेवक कै. राम कोठारी कै शरद कोठारी या रामभक्त यांच्या स्मरणार्थ शिरूर येथे भव्य रक्तदान ...१६१ जणांचे रक्तदान

9 Star News
0
शिरुर,प्रतिनीधी
विश्व हिंदू परिषद, बजरंग दल शिरुर प्रखंड तर्फे अयोध्या येथील कार सेवेत कै. राम कोठारी कै शरद कोठारी या रामभक्त यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते .
मंगळवार दि. १० डिसेंबर रोजी 
 श्री राम मंदिर, राम आळी, शिरूर
शिबीराचे आयोजन करण्यात आले या रक्त्दान शिबीरात १६१ जणांनी रक्तदान करुन शिबीराला उत्स्फृर्त प्रतिसाद दिला .
श्रीरामजन्मभूमी मुक्ती आंदोलनात भविष्यात प्रभु श्रीरामांचे भव्य असे मंदिर व्हावे ही इच्छा ठेऊन स्वतःच्या प्राणाची आहुती देणाऱ्या कारसेवकांच्या, हुतात्मे कोठारी बंधुंच्या स्मरणार्थ दरवर्षी बजरंग दलाच्यावतीने देशभर रक्तदान शिबीर राबविले जाते.
या वेळी प्रत्येक रक्तदात्याला हॉट ॲण्ड कुल बॉटल देण्यात आली व वर्षभरात गरज लागल्यास १ रक्त पिशवी मोफत देण्यात येणार आहे .
हे शिबीर यशस्वी करण्या साठी 
गणेश रौंदळ , अजिंक्य तारु, गणेश राक्षे ,सुनील इंदुलकर ,सागर परभणे ,शिवम खैरनार ,अमोल लुनिया ,ओंकार अष्टेकर ,रोहन जामदार ,कृणाल काळे आदींनी प्रयत्न केले .
या शिबीरासाठी अहिल्यानगर बल्ड बॅंक यांनी सहकार्य केले .
फोटो बजरंग दला तर्फे आयोजीत करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात रक्तदाते व आयोजक
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!