पिंपरखेड (ता. शिरूर) येथील दत्तवाडी येथे वीजवाहक तारांमध्ये शॉर्टसर्किट होऊन ऊसशेतात आग लाखोंचे नुकसान

9 Star News
0
शिरूर प्रतिनिधी
पिंपरखेड (ता. शिरूर) येथील दत्तवाडी येथे वीजवाहक तारांमध्ये शॉर्टसर्किट होऊन ऊसशेतात आग लागली. या आगीत तीन शेतकऱ्यांचा साडेतीन एकर ऊस जळूण शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची घटना घडली.
        ऊसशेतातून गेलेल्या वीजवाहक तारांमध्ये शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत शेतकरी रूपाली नवनाथ ढोमे यांचा दीड एकर, मच्छिंद्र पंढरीनाथ ढोमे यांचा दीड एकर ऊसाचा खोडवा, काशिनाथ विठोबा ढोमे यांचा वीस गुंठे ऊस जळाला.स्थानिकांनी आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला.परंतु, दुपारच्या वेळी आग नियंत्रणात आणणे शक्य झाले नाही.मात्र दत्तात्रय बबन बोंबे यांचा तोडणी सुरू असलेला ऊस वाचवण्यात यश आले.
         बेटभागात उसाचे क्षेत्र मोठे असून, अनेक उसावरून वीजवाहक तारा गेलेल्या आहेत. त्या तारांमध्ये अनेक ठिकाणी झोळ पडलेले असून, याबाबत महावितरणला वारंवार कल्पना देण्यात आलेली आहे. मात्र, तरीही महावितरणकडून दुर्लक्ष केले जात असल्याने शॉर्टसर्किट होऊन आगीच्या घटना घडत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.

फोटो: पिंपरखेड (ता.शिरुर ) येथे वीजेच्या तारांच्या घर्षणामुळे ऊसाला लागलेली आग

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!