मलठण (ता. शिरुर) येथील माळवस्ती येथे घरगुती वादातून पत्नीने पतीच्या डोक्यात पहार मारून जखमी केल्याने पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अभिजित भिका भोसले (वय २८ वर्षे रा. माळवस्ती मलठण ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिरुर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी तृप्ती अभिजित भोसले (वय २४ वर्षे रा.माळवस्ती, मलठण ता. शिरुर जि. पुणे) या महिलेवर गुन्हा दाखल केला.
मलठण (ता.शिरूर) येथील माळवस्ती येथे अभिजित भोसले व तृप्ती भोसले हे दाम्पत्य राहत आहे. या दाम्पत्यामध्ये घरगुती कारणातून वाद झाले. या कारणावरून तृप्ती हिने चिडून पती अभिजित यांना शिवीगाळ, दमदाटी करत हाताने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच घरातील लोखंडी पहार त्याच्या डोक्यात मारून त्यास जखमी केले. याबाबत अभिजित भिका भोसले (वय २८ वर्षे रा. माळवस्ती मलठण ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिरुर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तृप्ती अभिजित भोसले (वय २४ वर्षे रा.माळवस्ती, मलठण ता. शिरुर जि. पुणे) या महिलेवर गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस हवालदार अनिल आगलावे करत आहे.