शिरुर तालुक्यातील आदर्श मुख्याध्यापकाच्या मृत्यूने हळहळ
( प्रतिनिधी ) आंबळे ता. शिरुर येथील रहिवाशी असलेले आणि हवेली तालुक्यातील एका शाळेमध्ये मुख्याध्यापक असेलल्या शिक्षकाचा अलिबाग येथे फिरायला गेल्यानंतर समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला असून धर्मेंद्र शहाजी देशमुख असे समुद्रात बुडून मृत्यु झालेल्या मुख्याध्यापकांचे नाव आहे.
आंबळे ता. शिरुर येथील रहिवाशी असलेले आणि हवेली तालुक्यातील पिसोळी गावच्या महात्मा जोतिबा फुले विद्यालयात मुख्याध्यापक असलेले धर्मेंद्र देशमुख हे त्यांच्या तेरा सहकाऱ्यांसमवेत २७ डिसेंबर रोजी सहलीसाठी अलिबाग येथील काशिद बीच या समुद्र किनारी फिरायला गेले होते, समुद्राच्या पाण्यामध्ये सर्वजण पोहण्याचा आनंद घेत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने मुख्याध्यापक धर्मेंद्र देशमुख हे पाण्यात बुडू लागले, दरम्यान समुद्र किनारी असलेल्या जीव रक्षक दलाच्या टीमने धर्मेंद्र देशमुख यांना पाण्यातून बाहेर काढत जवळील बोर्ली गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले, मात्र देशमुख यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वी मुख्याध्यापक धर्मेंद्र शहाजी देशमुख वय ५५ वर्षे रा. आंबळे ता. शिरुर जि. पुणे यांचा मृत्यू झाला असून घडलेल्या घटनेने आनंदासाठी सहलीला गेलेल्या शिक्षकांवर काही क्षणात अनर्थ घडला तर घडलेल्या घटनेने शिरुर सह हवेली तालुक्यातील शिक्षकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
सोबत - धर्मेंद्र देशमुख यांचा फोटो.