( प्रतिनिधी ) कोरेगाव भीमा ता. शिरुर येथे १ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर प्रशासन विशेष खबरदारी घेत असून सध्या प्रशासन शौर्यदिन कार्यक्रमाच्या तयारीला लागले असताना नुकतेच उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोलिसांच्या दंगा काबु योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली आहे.
कोरेगाव भीमा ता. शिरुर येथे एक जानेवारी रोजी शौर्यदिनी विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम पार पडत असताना सदर कार्यक्रम शांततेत पार पडण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रमाचे नियोजन करत आहे, सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने शिक्रापूर येथे दोन स्वतंत्र पार्किंग करण्यात आलेले असताना येथील पार्किन परिसरात उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले व पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, महादेव वाघमोडे यांच्या उपस्थितीत रांजणगाव एमआयडीसि व शिरुर पोलीस स्टेशनच्या पोलीस पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची दंगा काबु योजनेची रंगीत घेण्यात आली दरम्यान या दंगा कबु योजना तालीम मध्ये एक टिअर स्मोक सेल सर्प व एक टिअर स्मोक ग्रेनेड वापरण्यात आले असल्याचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी सांगितले.
फोटो खालील ओळ – शिक्रापूर ता. शिरुर येथे पार पडलेली पोलिसांची दंगा काबू योजनेची रंगीत तालीम.