कोरेगाव भीमा विजय स्तंभ अभिवादन..... सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर : प्रशांत ढोले

9 Star News
0
सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर : प्रशांत ढोले

शिरुर प्रतिनिधी मुकुंद ढोबळे 
        कोरेगाव भीमा ता. शिरूर येथे ऐतिहासीक विजयस्तंभ मानवंदना व अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पाडत गावामध्ये सामाजीक सलोखा निर्माण करण्यासाठी व येणाऱ्या अनुयायांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून स्थानीकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी वरीष्ठांकडे याबाबत पाठपुरावा करु असे सांगत सोशल मीडियावर वादग्रस्त मेसेज टाकणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांनी सांगितले.

कोरेगाव भीमा ता. शिरूर येथे ऐतिहासीक विजयस्तंभ मानवंदना व अभिवादन कार्यक्रमासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांची बैठक पार पडली याप्रसंगी शिक्रापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक दिपरतन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरिक्षक संदिप साळुंखे, सरपंच संदीप ढेरंगे, शिवसेनेचे अनिल काशीद, अण्णासाहेब मगर बँकेचे संचालक राजाराम ढेरंगे, सोसायटीचे अध्यक्ष अशोक गव्हाणे, माजी सरपंच अमोल गव्हाणे, नवनाथ माळी, माजी उपसरपंच गणेश कांबळे, सदस्य केशव फडतरे, माजी अध्यक्ष

बबुशा ढेरंगे, माजी सदस्य उमेश गव्हाणे, कुंदा फडतरे, मीना ढेरंगे, विवेक ढेरंगे, राजेंद्र गवदे, अमीर इनामदार, राजेशसिंह ढेरंगे, सचीतानंद कडलक, दीक्षांत भालेराव, प्रवीण खलसे, ग्रामविकास अधिकारी श्रीकांत वाव्हळ, पोलीस पाटील मालन गव्हाणे, संदिप कारंडे यांसह ग्रामस्थ व नागरीक उपस्थित होते. यावेळी बोलताना अनुयायांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन केले असुन बसेसची संख्या व वाहनतळाच्या जागा वाढविण्यात आल्या आहे.

भीमा नदीवरील पुलावर बांधकाम विभागाकडून संरक्षक

जाळी बसवल्या जातील मात्र सोशल मीडिया वर चुकीचे मेसेज न टाकण्याचे आवाहन यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांनी केले.

तर पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी मागील वर्षी अपुऱ्या बॅरिगेटिंगमुळे चेंगरा चेंगरीची शक्यता झाली होती त्यातून मार्ग काढत यावर्षी वाहनतळ व बॅरिगेटिंग मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली असून २०१८ च्या दंगलीचा आपल्या गावावर पडलेला डाग नक्कीच पुसून टाकायचा आहे यासाठी ग्रामस्थांचे मोठे सहकार्य मिळावे असे आवाहन केले.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!