देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे यांच्यामार्फत शिरुर तालुक्यातील आमदाबाद येथील कार्यकर्त्यांना पूजनासाठी गाय घेऊन येण्याची सूचना केली होती. त्यानुसार कार्यकर्त्यांनी गावातील भाऊसाहेब माशेरे यांची गाय स्वच्छ धुवून तिला टेम्पोत घालून आज पहाटेच मुंबई कडे प्रयाण केले.
शपथविधीसाठी रवाना होण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी सागर बंगल्यावर या गोमातेचं पूजन केले. बळीराजाचं राज्य यावं म्हणून ही पूजा करण्यात आली असल्याचे यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
या वेळी गाई समवेत आलेल्या भाऊसाहेब माशेरे, चेअरमन आबासाहेब जाधव, नितीन माशेरे, वैभव जाधव यांची देवेंद्र फडणवीस यांनी जातीने विचारपूस केली. त्यानंतर फडणवीस यांनी सर्वे देवाः स्थिता देहे सर्वदेवमयी हि गौः शपथविधीपूर्वी राज्यमाता, सर्वदेवमयी गोमातांचे पूजन करून आशीर्वाद प्राप्त केले... असे ट्रीट करीत गो पूजनाचे कार्यकर्त्यांसह छायाचित्र त्यांनी आपल्या ट्रीटरवर टाकले. आज संपूर्ण शिरुर तालुक्यात यांची चांगलीच चर्चा रंगली.