शिक्रापूर पोलिसांनी व बजरंग दल यांनी वाचवले कत्तलीतून नऊ वासरांचे प्राण

9 Star News
0
शिक्रापूर पोलिसांनी व बजरंग दल यांनी वाचवले कत्तलीतून नऊ वासरांचे प्राण
शिरूर 
( प्रतिनिधी ) तळेगाव ढमढेरे ता. शिरुर येथील धानोरे रोड येथून कत्तलीसाठी वासरे घेऊन चाललेल्या टेम्पोला अडवून टेम्पोतील कत्तलीसाठी चाललेल्या नऊ वासरांचे प्राण बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने वाचविण्यात पोलिसांना यश आले असून पोलिसांनी वासरांची वाहतूक करणाऱ्या अज्ञात चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
                         शिक्रापूर ता. शिरुर येथे पोलीस कर्मचारी वाहतूक नियमनाचे काम करत असताना तळेगाव ढमढेरे धानोरे रस्त्याने एम एच १२ एस एक्स ०८०६ या पिकअप वाहनातून काही वासरे कत्तलीसाठी जात असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना दिली असता पोलीस हवालदार अमोल नलगे, पोलीस शिपाई राजेंद्र काळे यांनी सदर ठिकाणी धाव घेतली, मात्र यावेळी काही कार्यकर्ते वाहनाच्या आजूबाजूने ये जा करत असल्याचे लक्षात येताच वाहन चालक पिकअप वाहन रस्त्यावर उभे करुन पळून गेला, दरम्यान पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने वाहनातील नऊ वासरांची सुटका करत सर्व वासरे लोणीकंद येथील गोशाळेत दाखल करत वासरांना जीवदान दिले,याबाबत पोलीस शिपाई राजेंद्र हरिश्चंद्र काळे रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी एम एच १२ एस एक्स ०८०६ या वाहनावरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमोल नलगे हे करत आहे.
फोटो खालील ओळ – शिक्रापूर ता. शिरुर पोलिसांनी कत्तलीपासून वाचवलेली वासरे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!