तळेगाव ढमढेरेत लिफ्टच्या बहाण्याने वृद्धाची चैन लांबवली

9 Star News
0
तळेगाव ढमढेरेत लिफ्टच्या बहाण्याने वृद्धाची चैन लांबवली
शिरूर 
( प्रतिनिधी ) तळेगाव ढमढेरेत ता . शिरूर येथे लिफ्टच्या बहाण्याने साठ वर्षे वृद्धाची चैन तिघा जणांनी लांबवली असून, याबाबत तीन अज्ञात तरुणा विरोधात शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळेगाव ढमढेरे ता. शिरुर येथील माळीमळा रोडने कैलास भुजबळ हे त्यांच्या ताब्यातील दुचाकीहून त्यांच्या दुकानात जात असताना रस्त्यात त्यांना तिघा इसमांनी हात करत एका इसमाने मला तळेगावात जायचे आहे, तुमच्या सोबत घेऊन चला असे म्हटल्याने कैलास हे त्या इसमाला दुचाकीवर बसवत असताना बाजूला उभ्या असलेल्या दोघांनी कैलास यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाची सोन्याची चैन हिसकावली आणि तिघेजण त्यांच्या जवळील दुचाकीहून पळून गेले, याबाबत कैलास सावळेराम भुजबळ वय ६० वर्षे रा. माळीमळा तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी तीन अज्ञात युवकांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे हे करत आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!