शिरूर छत्रपती कॉलनी येथे पत्नीने पती बरोबर राहण्यास नकार दिल्याने चिडलेल्या पतीने पत्नीला हाताने मारहाण व धारदार शस्त्राने वार करून जखमी केले आहे. याबाबत पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत तीस वर्षे पत्नीने शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी आहे.
काळूराम हरिभाऊ पाबळे (रा. राजमातापार्क शिरूर ता शिरूर जि पुणे) याच्यावर पत्नीने गुन्हा दाखल केला आहे.
शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे सकाळी 8/30 वाचे सुमारास शिरूर छत्रपती कॉलनी येथील साई सोनोग्राफी सेंटर समोर फिर्यादी पत्नीने पती काळूराम यांच्यासोबत राहण्यांसाठी नकार दिल्याच्या कारणावरून त्याने शिवीगाळ करून हाताने तसेच लहान चाकू सारख्या धारदार वस्तूने पत्नीला हाताच्या मनगटावर मारून दुखापत केली व जीवेमारण्याची धमकी दिली याबाबत पत्नीने शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून, पती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सावळे हे करीत आहे.