शिरूर प्रतिनिधी
पिंपळसुटी ता.शिरूर येथे माहेरी गेलेल्या पत्नीला आणताना दुचाकीवरील ताबा सुटून लोखंडी कठड्याला धडकून झालेल्या अपघातांत पतीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, पत्नी जखमी झाली आहे.
अंकुश मारुती केदारी (वय ४०), असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, अनिता अंकुश केदारी या जखमी झाल्या आहेत.
हा अपघात पिंपळसुटी (ता. शिरूर) येथे शनिवारी (ता. २८) सकाळी १० वाजता हा अपघात झाला.
याबाबत शितल गायकवाड यांनी खबर दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार . अनिता माहेरी इनामगाव येथे गेल्या होत्या. त्यांना आणण्यासाठी
त्यांचे पती अंकुश हे दुचाकीवरून (क्र. एम.एच. १२ एच.एक्स. ५२९६) इनामगाव येथे गेले होते. शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ते दुचाकीहून येत असताना पिंपळसुटी गावच्या हद्दीत पवारवस्ती व फराटेवस्ती परिसरात त्यांच्या भरधाव दुचाकीची लोखंडी पत्र्याच्या संरक्षक कठड्याला धडक बसली. या अपघातात अंकुश हे गंभीर जखमी झाले, तर अनिता यांना किरकोळ दुखापत झाली. स्थानिक नागरिकांनी न्हावरे येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल त्याला केले. मात्र, उपचारापूर्वीच अंकुश यांचा मृत्यू झाला. पत्नीला दुखापत झाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संपत खबाले करत आहेत.