शिरूर तालुक्यात विधानसभा निवडणुकीनंतर वाळू माफिया मुजोर झाले असून काल गुनाट येथे दोन अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक नागरिकांच्या सांगण्यावरून पोलिसांनी पकडले परंतु वाळू माफी यांनी रात्री दहा ते आज दुपारी अडीच वाजेपर्यंत वाळू ट्रकच्या चाव्या नदिल्याने व राजकीय दबाव आणल्याने ट्रक रखडून ठेवल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे पोलीस व महसूल प्रशासनाला याना मुजोर वाळू माफियाचामोठा त्रास सहन करावा लागला आहे.त्यामुळे या वाळू माफीयावर सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा महसूल प्रशासन दाखल करणार का?
आज सुट्टीचे कारण दाखवून रात्री आठ वाजेपर्यंत कुठलाही गुन्हा शिरूर तहसील कार्यालयाच्या वतीने शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला नव्हता तर यातील एक वाहन चालकावर या अगोदरही गुन्हे दाखल असल्याचे बोलले जात आहे. महसूल प्रशासनाच्या वतीने रात्रीच कार्यवाहीसाठी या दोन्हीही ट्रकचा पंचनामा ऑनलाईन केला आहे. यावर उद्या दंडात्मक कारवाई करणार असल्याचे समजते.
यामुळे शिरूर तालुक्यात निवडणुकीनंतर पुन्हा वाळूमफिया मुदर झाले असून पोलीस प्रशासन असो किंवा महसूल प्रशासन यांना जूमानात नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे तर राजकीय दबावानात गाड्या सोडवण्यासाठी प्रयत्न झाला असल्याचे बोलले जात आहे.
परंतु काही स्थानिक नागरिक पोलीस महसूल खाते यांनी या वाळू माफियाच्या मुजोरीला नजूमानता व राजकीय दबावाला नजुमानता दोन्ही ट्रक जप्त करून शिरूर पोलीस स्टेशन येथे आणून महसूल कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिले आहे.
या वाळू ट्रक वर काम करणारा एक बिहारी तर एक स्थानिक चालक असून हे चालक हे मुजोर असून,पोलीस व महसूल प्रशासन यांच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्नही त्यांनी केला असल्याचे दिसून आले. ट्रकच्या चाव्या काढून घेऊन पोलीस व महसूल प्रशासनाला 14 तासाहून जास्त काळ रखडून ठेवले होते.
अखेर आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ट्रकच्याचाव्या दिल्यानंतर पोलीस प्रशासनाने या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक वाळूसह शिरूर पोलीस स्टेशन व महसूल कार्यालय येथे आणून महसूल विभागाच्या ताब्यात दिले आहे.
या वाळू ट्रक सोडवण्यासाठी महसूल विभागावर एका लोक प्रतिनिधीच्या माध्यमातून मोठा दबाव आणण्याची चर्चा आहे.
शिरूर तालुक्यात विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आमदार बदलताच वाळू माफिया यांनी हैदोस सुरू केला आहे. याचाच हा प्रत्यय आहे. या वाळू माफियांन पाठीशी कोण घालते कुठला राजकीय दबाव आहे. ज्यांनी या वाळूमाफ्यनी 14 तास वाळू भरलेले ट्रक पोलीस व महसूल प्रशासन यांना हलवून दिले नाही.
रात्री महसूल खात्याचे अधिकारी आले त्यांनी ऑनलाईन या ट्रकचा पंचनामा केला आहे.. त्यानंतर रात्री साडेदहा ते दुपारी अडीच वाजेपर्यंत या ट्रकची राखणदारी करण्याचे काम व त्याची चावी मिळवण्याचे काम पोलिसांना करावे लागले असले तरी याबाबत गुन्हा मात्र महसूल विभागाने दाखल करणे गरजेचे होते परंतु अद्याप कुठलाही गुन्हा शिरूर पोलीस स्टेशन येथे दाखल झाला नसून महसूल प्रशासन याबाबत वाळू वाहतूक करणारे माफिया व पोलीस व महसूल प्रशासनाची अडवणूक करणारे वाळू माफिया यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज असून अन्यथा पुढील काळात वाळूमाफिया तुमच्या जीवाशी खेळतील हे मात्र नक्की खरे आहे. अशा घटना या अगोदरही शिरूर तालुक्यात झाले आहेत.